नागपूर – कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत , राज्य कृषी मंत्री असताना 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यात राजीक्या वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा…संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरली. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.