छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवत बॉलीवूडपर्यंत मजल मारणारी अभिनेत्री हिना खान सतत कोणत्या-न-कोणत्य कारणांमुळे चर्चेत असते. हिना आणि तिचा बॉयफ्रेण्ड रॉकी जैसवाल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
हिनाने रॉकीसोबत असलेले तिचे नात जाहीरपणे कबूल केले आहे. मात्र, हिनाने नुकत्याच शेअर केलेल्या एक पोस्टमुळे तिचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा सुरू आहे. हिना खानने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सोशल मीडियावर हिना ट्रेडिंगमध्ये होती.
हिनाने तिच्या इन्स्टास्टोरीला एक फोटो शेअर करत “टाइम टू ब्रेकअप’ असे कॅप्शन दिले होते. हिनाची ही पोस्ट ट्विटरवर व्हायरल होत असून अनेक जण तिला ब्रेकअप झाले का? असा प्रश्न विचारत आहे.
ट्विटरवर हिनाची ही पोस्ट शेअर करत तिचा एक चाहता म्हणाला, दुःखी होऊ नकोस हिना खान…तुला असे पाहू शकत नाही… हसत आणि आनंदी राहा, तू ठीक आहेस का? दरम्यान, हिना खानच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. मात्र, प्रत्यक्षात नेमकं काय घडलं. याचा उलगडा अद्याप झालेला नाही.