नांदगाव – राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शानासाठी जाताना दिसून येत आहे. अशातच एक महिला आपल्या तीन मुली व मैत्रिणीसह देवीच्या दर्शनासाठी जात असताना रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडली आहे.
स्वाती रविंद्र शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला रविवारी पहाटे देवीच्या दर्शानासाठी आपल्या तीन लहान मुली व मैत्रिणीसोबत जात होती. दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना, दोन रेल्वे एकाच वेळी पास झाल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. या महिलेने आपल्या लहान मुलीसमोरचं प्राण सोडले आहे. हा घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.