पाठीच्या दुखापतीमुळे हिमा दास डोहा चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये हिमा दास भारतीय तुकडीचा भाग होवू शकणार नाही. तिच्या पाठीच्या दुखापतीचा विचार करता ऍथलेटिक महासंघाने हा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी डोहा येथे झालेल्या चॅम्पियनशिप पार पडणार आहे. तथापि, फेडरेशनने हिमाची अनुपस्थिती व दुखापतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.

वर्ल्ड चॅम्पियनशिपविषयी सर्व एथलीट्‌सची अंतिम एंट्री सोमवारी पाठवायची होती, त्यात हिमा आणि रिलेमध्ये सामील असलेल्या अय्यासामी धारुणचे नाव नाही. 9 सप्टेंबरला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवडल्या गेलेल्या संघात हे दोन्ही खेळाडू होते. त्यावेळी निवड समितीच्या बैठकीतही काही सदस्यांनी फेडरेशनवर हिमाच्या दुखापतीबाबत प्रश्न केला होता. त्यानंतर सांगितले होते की ती पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर ती चॅम्पियनशिपमध्ये खेळेल मात्र तिच्या दुखापतीमुळे या स्पर्धेपासून तिला दुर रहावे लागणार आहे. दरम्यान, हिमा यावर्षी आशियाई चॅंपियनशिपपूर्वी आधीच जखमी झाली आहे. यात तिच्या पाठीला गंभीर इजा झाली आहे. मात्र असे असुनही हिमाने युरोपमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वास्तविक, हिमाला 200 मीटर नंतर चालताना त्रास होत आहे. ती 200 मीटर आरामात धावत आहे, परंतु यानंतर तिची समस्या उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.