पुणे – शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक व नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि यांना पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले. निमित्त होते ‘यशदा’ आयोजित केलेल्या क्षेत्रभेटीचे.
महाबळेश्वर ( Mahabaleshwar ) तालुक्यातील भिलार ( bhilar ) हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असून शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या राज्य शासनाच्या शिखर संस्थेत शिक्षण व आयजीआर विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते. सत्रसंचालिका म्हणून डॉ.अनिता महिरास व अक्षय बनसोडे काम पाहिले. ( Villege of books )
नोंदणी महानिरीक्षक विभागातील गजानन वाखडे, के.आर. दवंगे, विजय भालेराव, किशोरकुमार मगर, हेमलता जगताप, संतोष हिंगाणे, गोविंद गीते, श्रीकांत सोनवणे, के एस कांबळे, सुनील पाटील, अशोक आटोळे, आर.जी.जानकर, आर.टी.नाईक, प्रकाश खोमणे आणि शालेय शिक्षण विभागातील श्रीराम पानझाडे, हारून आतार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, रमाकांत काटमोरे, अनुराधा ओक, औदुंबर उकिरडे, डॉ.सुभाष बोरसे, वैशाली जामदार, सुधाकर तेलंग, चिंतामण वंजारी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, अनिल साबळे, शिवलिंग पटवे, निशादेवी वाघमोडे, माधुरी सावरकर हे सर्व वर्ग एकचे अधिकारी राज्यातील विविध जिल्ह्यातून भिलार मध्ये आले होते.
भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, महेश ननावरे, मोमीन, संगीता शिंदे, अर्चना गाडेकर, अमोल आंब्राले व पुस्तकाचे गाव प्रकल्प अधिकारी बालाजी हाळदे, राजेश जाधव, उमा शिंदे, संतोष भिलारे, प्रमोद पवार यांनी स्वागत करून प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान या चमूने वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी विजय जगताप यांनी स्वागत केले.
सन २०१८ मध्ये साताऱ्यात झालेल्या ऐतिहासिक राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भिलारला व्यवस्था केली होती. शिवाय त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन भिलारला झाले होते. तेंव्हाच्या या दोन्ही बाबी संस्मरणीय आहेत. अनेक सहकाऱ्यांनी सहकुटुंब पुस्तकांच्या मेजवानीस पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे.
– राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक, योजना शिक्षण संचालनालय