मुंबई – राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 18 जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला याप्रकरणी 25 जानेवारीपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश गुरूवारी जारी केले.
याप्रकरणी आता जानेवारीत सुनावणी घेण्यात यावी, अशी दोन्ही बाजूंनी विनंती करण्यात आल्याने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली. राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे.