वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांचा जन्म हा घरातील सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असतो. पण जेव्हा जुळे मुलं जन्माला येतात आणि त्यांची जन्म तारीख आणि साल वेगळे येते तेंव्हा खरंच हे जगातील आश्चर्य ठरते. असेच आश्चर्य घडले असून दोन जुळ्या बहिणींचा केवळ काही मिनिटांनी साल आणि जन्म तारीख बदलली आहे.
न्यू जर्सी मधील ईव्ह आणि बेली या जोडप्याबाबत ही घटना घडली आहे. या जोडप्यातील महिलेने 31 डिसेंबरला रात्री 11:48 प्रथम एका मुलाला जन्म दिला त्यानंतर 40 मिनिटांनी म्हणजेच एक जानेवारी 2024 रोजी 12 वाजून 28 मिनिटांनी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
रात्री बारा वाजताच इंग्रजी तारीख बदलत असल्याने या दोन्ही मुलांच्या जन्मतारखा आणि जन्म वर्षांमध्ये एका वर्षाचा फरक पडला महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री 11:48 ज्या मुलाचा जन्म झाला त्याची आणि त्याच्या वडिलांची जन्मतारीखही एकच आहे. म्हणजेच या जुळ्या मुलांच्या वडिलांचा जन्मही 31 डिसेंबर रोजीच झाला होता.