Virat kohli Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दूसरा कसोटी सामना रंजक ठरला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 विकेट्स घेऊन पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र यादरम्यान विराट कोहलीची एक रिअॅक्शन चर्चेत आली आहे. केशव महाराज फलंदाजीला आल्यानंतर राम सिया राम हे गाणं वाजलं. त्यानंतर विराट कोहली याने हात जोडले. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
🚨When “Ram Siya Ram” bhajan was played during #INDvsSA, Virat Kohli pulled the string of the bow like Ram ji and folded his hands. #ViratKohli #RamSiyaRam 🙏🏼🚩 pic.twitter.com/sX9lH7Y7Ts
— Nitish k. yadav🇮🇳 (@Nitishk82961661) January 4, 2024
मार्को यान्सन (0) बाद झाल्यानंतर केशव महाराज क्रीजवर पोहोचला. भारतीय वंशाचा केशव महाराज हा श्री राम आणि हनुमानजींचा भक्त आहे. केशव महाराज क्रिझवर आल्यानंतर मैदानावर राम सिया राम, हे गाण वाजू लागले. यादरम्यान विराट कोहलीने कथ्थक स्टाईलमध्ये धनुष्य-बाणाचे हावभाव केले आणि प्रेक्षकांना हात जोडून अभिवादन केले. विराट कोहलीची ही रिअॅक्शन चर्चेत आहे. केशव महाराज 13 चेंडूत केवळ तीन धावा काढून बाद झाला. आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावसंख्याही पार करत आली नाही.
आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 153 धावांवरच आटोपला आहे आणि भारताने 98 धावांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे दुसऱ्या भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही आणि 153 धावांवरच भारताचा डाव आटोपला.