बॉलिवूड ड्रग्स पार्ट्यांबाबत हेमा मालिनी म्हणाली…

नवी दिल्ली – अभिनेता आणि भाजपा खासदार रवी किशनने लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करी हा मुद्दा उचलून धरला. यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य केलं. यात अभिनेत्री दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी  देखील प्रतिक्रिया दिली असून जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.

आता या मुद्यावरून अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो हे कसं बोलता? जगात अनेक क्षेत्र आहेत ज्याठिकाणी ड्रग्स वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.