चला, खाऊयात ‘सनी लियॉनी मॅगी’!

आतापर्यंत आपण विविध कलाकारांच्या नावाने असलेल्या वस्तूंबाबत ऐकलं आहे. उदा.शाहरुख खान, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर तसेच पॉप गायिका शकिरा यांच्या नावाने विकले जाणारे परफ्यूम. पण, आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या नावे तिच्यासारखाच चटपटीत पदार्थ मिळत असेल तर? होय, अहमदाबादमधील गल्लीबोळात चक्क ‘सनी लियॉनी मॅगी’ धडाक्यात विकली जातेय. 60 रुपये प्लेटने विकल्या जाणाऱ्या या अनोख्या मॅगीत एवढं काय खास आहे, हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल.

भारतातील बहुतेक प्रत्येक शहर आणि गावात स्ट्रीट फूड मोठ्या आवडीने खाल्ले जाते. रस्त्यावर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भरपूर गर्दी होते. मॅगी जगभरात मोठ्या उत्साहाने खाल्ली जाते.  मॅगी हॉस्टेल आणि विद्यार्थ्यांना घरापासून दूर राहण्यासाठी एक वरदान आहे. मॅगी हा झटपट बनणारा पदार्थ असून त्याची चव उत्कृष्ट आहे.

गुजरातेतील अहमदाबादला मिळणारी ‘सनी लियॉनी मॅगी’ खाण्यासाठी आपण अहमदाबादला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही आपल्याला घरच्या घरी ‘सनी लियॉनी मॅगी’ बनवण्यास शिकवित आहोत.  चला तर, आपण ही मलईदार, मसालेदार आणि तितकीच मजेदार मॅगी बनवायला शिकूया.

सनी लियॉनी मॅगी 
साहित्य : एक पॅकेट मॅगी,अर्धी बारीक चिरलेली कॅप्सिकम, कांदा, गाजर, स्वीट कॉर्न, लोणी, हळद, लाल तिखट.

कृती : प्रथम नॉन-स्टिक पॅनमध्ये दोन चमचे लोणी घाला. चांगले गरम करा.
आता त्यात स्वीट कॉर्न, बारीक चिरलेली कॅप्सिकम, कांदा आणि गाजर घाला.  मध्यम आचेवर चांगले शिजवा. भाज्या व्यवस्थित शिजल्या की त्यात दीड कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात मॅगी मसाला घाला. मग मॅगी तोडून त्यात घाला.

जेव्हा मॅगी किंचित मऊ होईल तेव्हा त्यात अमूल मलई घाला. आपल्याला आवडीनुसार पाहिजे तितके मलई घाला.

यानंतर एक चिमूटभर हळद, लाल तिखट आणि मिरपूड पावडर घालावी. आता हे सर्व चांगले मिक्स करा आणि पाणी कोरडे होईपर्यंत ढवळत राहा.

5 मिनिटांत मॅगीचा रंग बदलेल. आता पाणी पूर्ण आटवा. सनी लिओनी मॅगी तयार!
लोक या मजेदार मॅगीचा आस्वाद  60 रुपयांमध्ये घेतात. तुम्ही घरच्या घरी अगदी कमी खर्चात मनसोक्त खा!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.