Hema malini । 2024 मध्येच अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत अनेक अभिनेते आणि राजकारणी सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनीही प्राण प्रतिष्ठामध्ये भाग घेतला होता, अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. आता हेमा मालिनी अभिनेत्री पुन्हा एकदा राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत गेल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना रोजगार या मुद्यावरून भाष्य केले त्यांचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या माध्यमांशी मंदिराबद्दल बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मंदिराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आपले मत व्यक्त करताना हेमा मालिनी दिसत आहे.
राम मंदिरात पूजा केल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘आम्ही चांगले दर्शन घेतले. मंदिराची व्यवस्था चांगली आहे. मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे.’ समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी कारमध्ये बसलेल्या दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.