बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला अवकाळी पावसाने झोडपल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजुरी, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, बांगरवाडी येथे गुरुवारी (दि. 14) मध्यरात्रीच्या सुमारास दमदार हजेरी लावली.
गुरुवारी सकाळपासून गरम वातावरण निर्माण होऊन आभाळ आलेले होते व दुपारनंतर अचानक जोराचा वारा सुटून पावसास सरूवात झाली. शेतकऱ्यांचे ऊस मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.