मुंबई : भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा या सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. या ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट या गोष्टी नेहमीच होत असतात. आता आणखी खेळाडूच्या अशा चर्चा सोशल मीडियावर सतत होत असतात.
यातच बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात, मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेकपटू यांचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील गोष्टी एवढ्या पुढ्या गेल्या की एकमेकांच्या कुटुंबीयांनीही भेट घेतली.
भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या एका सोशल मीडियावर पोस्टवर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. एवढेच नाही तर नव्या गर्लफ्रेंडविषयी हार्दिक गंभीर असून त्यानं नताशाची कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली.
त्यामुळं सध्या हार्दिक पांड्या या नव्या नात्याबाबत खुश आहे. याआधी हार्दिक पांड्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. रविवारी इन्स्टाग्रामवर पांड्यानं इन लव्ह अशी पोस्ट केली होती. यावर नताशानं तशीच प्रतिक्रिया दिली.