नवी दिल्ली – करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. आंध्रप्रदेशमधील श्रीकाकुलम गावात घडलेल्या घटनेमुळे करोनाविषयी लोकांमध्ये किती भीती आहे, हे स्पष्ट झालं आहे. श्रीकाकुलम गावामध्ये एक मुलगी आपल्या कोरोना बाधित वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिची आई तिला करोना होण्याच्या भींतीने रोखत असल्याच्या व्हिडियो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.
Heart-wrenching!! Unable to see the plight of his #COVID19 infected father, daughter went and poured water in his throat despite mother’s objection. However, he breathed his last. #Srikakulam reported 2398 fresh #coronavirus cases (#AndhraPradesh 20,0034 new cases, and 82 deaths) pic.twitter.com/grNvwZ1s4X
— Aashish (@Ashi_IndiaToday) May 5, 2021
याबाबत हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार,या व्यक्तीच वय ५० होते विजयवाडा येथील कंपनीत ते काम करत होते. कोरोना संक्रमित असूनही हे व्यक्ती श्रीकाकुलम या आपल्या गावी आले. यावेळी गावकऱ्यानी या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला गावाबाहेरील एका झोपडीत राहण्यास भाग पाडण्यात आलं. यादरम्यान या व्यक्तीची मुलगी आपल्या वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखते.
मुलीलाही कोरोनाची लागण होऊ नये यामुळे मुलीची आईच तिला पाणी देण्यासाठी रोखते. मात्र थोड्या वेळानंतरही व्यक्ती जमिनीवर पडली असता यावेळी मुलीने वडिलांना पाणी पाजलं.काही वेळानंतर या व्यक्तीचा उपचारा विनाच मृत्यू झाला. याबाबत व्हिडियो बनवत असलेल्या व्यक्तीने सविस्तर माहिती दिली आहे.
यापूर्वीही आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली होती. मृत आईला रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह बाईकवरून स्मशानभूमीत नेण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.