कोलकाता : तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सलगतिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचे अभिनंदन केले आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to Mamata Didi on taking oath as West Bengal’s Chief Minister. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2021
गेल्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ममता यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीकास्त्र सोडले. नड्डा म्हणाले, “ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने हा अधिकार दिलेला आहे. पण आम्हीही ही शपथ घेतो की आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु”.