दातांच्या आरोग्याची काळजी घेताना हिरड्यांचीही काळजी घेणे आवश्यक असते. कारण हिरड्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच दातही मजबूत राहतात. दात कितीही चांगले असले तरी हिरड्या खराब असतील तर दात खराब होण्याचा धोका नेहमीच राहातो.
तसेच हिरड्या खराब दात खराब होणार आणि हसल्यावर दात तर दिसणारच ना! म्हणूनच दाताची अधिक काळजी घेणं तुम्ही गरजेचं असतं. आता दाताच्या सौंदर्याचा विचार करता तुम्हाला नक्की काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मग करुया सुरुवात
दोन वेळा घासा दात
ब्रश हिरड्या आणि दातांच्या वर 45 अंशांच्या कोनात हळूहळू फिरवावा. पहिले गोल गोल, नंतर वरून खाली आणि शेवटी खालून वर अशा पद्धतीने तो फिरवावा. ब्रश गोलाकार फिरवल्यामुळे हिरड्यांना मालिश होते आणि वर खाली केल्यामुळे दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून दातांची स्वच्छता होते.
समोरच्या दाताने टणक वस्तू खाऊ नका
तुम्ही पुढच्या दाताने जर सतत खात असाल तर तुमच्या पुढच्या दातांना त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला तुमचे दात नाजूक वाटत असतील तर तुम्ही हे मुळीच करु नका. कारण अशामुळे तुमचे दात तुटण्याची भीती असते.
दातांच्या फटी भरुन घ्या
तुमच्या दातांमध्ये खूपच गॅप असेल तर मग तुम्ही तुमच्या दातांच्या फटी भरुन घ्या. याचे कारण असे की, दातांच्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकू शकतात. हे अन्नकण जास्त वेळासाठी अडकले तर दातांना कीड लागू शकते.
डेंटल चेकअप महत्वाचं
तुमच्या तोंडाचे आरोग्य खराब असेल तर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तीन महिन्यातून एकदा तरी डेंटल चेकअप करण्यासाठी जा.