कढीपत्त्याचे ‘हे’ औषधी गुण आपल्याला माहिती आहेत काय ?

कढीपत्ता हे खूप दिवस टिकणारे, मध्यम उंचीचे, भरपूर हिरवी पाने देणारे झाड आहे. कढीपत्ता परसबागेत, शेताच्या बांधावर किंवा शेतात लावतात. या झाडाला भरपूर ऊन व मोकळी हवा लागते.

कढीपत्त्याच्या पानात पालक व मेथी या पालेभाज्यांपेक्षा “अ’ जीवसत्त्व अधिक प्रमाणात असते. इतर भाज्यांपेक्षा कर्ब व प्रथिने दुप्पटतिप्पट प्रमाणात जास्त असतात. तसेच खनिजे, लोह ही अन्नद्रव्येही असतात.

कढीपत्त्याची पाने विशिष्ट गंध असणारी, चवीला काही प्रमाणात कडू व तुरट असतात. जखम चिघळली असता व त्वचाविकारावर ही पाने गुणकारी आहेत. उलटी होत असेल तर कढीपत्त्याच्या पानाचा काढा बनवून पिण्यास देतात. कढीपत्ता पाने चावून खाल्ल्याने मुरडा बरा होतो.

कढीपत्त्याच्या मुळांचा रस घेतल्याने मुत्रविरोध दूर होतो. कीटकाच्या चाव्याने आलेली सूज कढीपत्त्याची पाने वाटून त्याचा लेप लावल्याने कमी होते. तसेच पाल्याचे पोटीस बांधल्याने देखील सूज कमी होते. त्याच्या पानांपासून “ग्लुकोसाईड तेल’ तयार करतात.

भारतीय स्वयंपाकात नेहमी वापरला जाणारा कढीपत्ता म्हणजे एक पचनसंस्थेला सहाय्य करणारी मोलाचीच वनस्पती आहे, असे मानले गेले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानेही भारतीय स्वयंपाकघरातील फोडणीच्या घटकांपैकी कढीपत्त्याला विशेष महत्त्वाचे मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.