ऍसिडीटी झाल्याची तक्रार अनेक जण वारंवार करताना दिसतात. मग त्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय अवलंबले जातात किंवा वेळप्रसंगी हा त्रास वाढल्यास डॉक्टरांकडेही जाण्याची वेळ येते. ही ऍसिडीटी होण्याची असंख्य कारणे असतात, मात्र त्यातील बहुतांश कारणे ही आपल्या जीवनशैलीशी निगडीत असतात.
त्यामुळे जीवनशैलीत थोडे बदल केल्यास या ऍसिडीटीपासून आपली सुटका होऊ शकते. यामध्ये अपुरी झोप, जेवणाच्या वेळा, फास्टफूडचे अतिसेवनयांसारख्या अनेक कारणांचा समावेश होतो. ऍसिडीटीची काही मुख्य कारणे आणि आहारात करता येतील असे सोपे बदल खालीलप्रमाणे…
ऍसिडीटीची कारणे –
- रात्री उशीरा जेवणे आणि त्यानंतर लगेच झोपणे.
- मानसिक ताणतणाव
- अपुरी झोप
- जेवणाच्या बदलत्या वेळा
- आहारात मसालेदार पदार्थ व तेलाचा अतिवापर
- भूक नसताना खाणे
- चहा कॉफीचे अतिसेवन
- सततचे औषधोपचार
- आहारात प्रथिनांची कमतरता
- व्यसनाधिनता
- या गोष्टींमध्ये बदल केल्यास ऍसिडीटीचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होते.
आहारात कोणते बदल कराल?
- आहारात दूध, दही यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करावा
- जास्त काळ भूक न मारणे.
- आहारात प्रथिने आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असतील याची काळजी घेणे.
- ज्वारी, नाचणी, बाजरी यांचा आहारात समावेश वाढविणे.
- जेवणाच्या वेळा बदलणार नाहीत याची काळजी घेणे.
- घरात केलेल्या अन्नाचे जास्तीत जास्त सेवन करणे.
- फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलाड यांचा आहारात समावेश करणे.
- मसालेदार अन्न आणि फास्टफूड यांचे सेवन कमीत कमी प्रमाणात करणे.