अॅलर्जी युक्त सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो.
लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.
चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.
नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.
हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा ऊपाय आहे.
आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.