फ्रान्स फुटबाॅल प्रशिक्षक ‘डिडिएर डेसचैम्प्स’नं रचला इतिहास

पॅरिस : फीफा विश्व चॅम्पियन फ्रान्सने प्रशिक्षक डिडिएर डेसचैम्प्स यांच्यासोबतचा करार २०२२ मध्ये कतार येथे होणा-या विश्वचषक स्पर्धेपर्यंत वाढवला आहे. सूत्राच्या माहितीनूसार यासंबंधीची अधिकृत घोषणा फ्रान्स फुटबाॅल महासंघाच्या संवाददाता सम्मेलनामध्ये करण्यात येणार आहे.

डेसचैम्प्स यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक जिंकला होता. ते २०१२ पासून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत.

नवीन करारानुसार डेसचैम्प्स हे संघासोबत सर्वात अधिक काळ प्रशिक्षकपदी राहण्याचा विक्रम आपल्या नावे करू शकतात. ते या बाबतीत ‘माइकल हिडालगो’ यांना मागे टाकू शकतात. हिडालगो हे ‘जानेवारी १९७६ ते जून १९८४’ दरम्यान संघाचे प्रशिक्षक होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)