हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात न्यू जनरेशन ही करिअरमध्ये इतकी व्यस्त झाली की, स्वतःसाठी जगायला विसरून गेली. न्यू जनरेशनने तंत्रज्ञानासमोर स्वतःला जसे रोबोट बनवून घेतले. कोरोना काळात विस्कटलेल्या जीवनशैलीमुळे वर्क फ्रॉम होम सारखे ऑनलाइन जॉब लोकांचा आवडीचा भाग बनली. जीवनशैली शॉर्टकट झाली हे मात्र नक्की!
कामाच्या व्यापामुळे, योगासने, प्राणायाम करायला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तरी असा रूट कुणालाच नको असतो. वर्क आऊट, एक्झरसाइज, जिम आणि विशेष म्हणजे वेट लॉससाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्ट्सना लोक आधी प्रायोरिटी देऊ लागली.
परिणाम- शरीरावर फास्ट रिझल्टही बघायला मिळतो, पण तो दीर्घकाळ टिकणारा नसतो हे मात्र लक्षात येत नाही.
शरीराची वेळीच योग्य काळजी न घेतल्यामुळे अकाली मोटापा, अनबॅलेंन्स
हार्मोन्स, डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिप्रेशन, जॉइन्ट पेन, मान-पाठ दुखी म्हणजे हाडामणक्यांचे आजार, कॅन्सरसारखे आजार डोकी वर काढू लागतात.
सिनेअभिनेत्री फिटनेस योगा टीचर शिल्पा शेट्टी वगळता क्रिकेटपटू युवराज सिंगप्रमाणेच बॉलिवूड, हॉलिवूड, काही देश विदेशी नेते अशा अनेक क्षेत्रातील लोकांनासुद्धा या अवस्थेतून जावे लागले.
जीवन हे अनमोल आहे म्हणून स्वत:ला वेळ द्या योग करा!
असा दुष्परिणाम टाळण्यासाठी योगासने करा. योग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन रोज आपल्याला शक्य होईल त्यावेळी वेळ काढून पंधरा मिनिटे प्राणायाम, अनुलोम-विलोम कपालभाती भस्त्रिका आणि सर्वात महत्त्वाचे “ध्यान योग’ जे शरीरासाठी अमृत संजीवनी मानले गेले आहे अशा योगसाधना नक्की करा.
प्राणायामने शरीरात ऊर्जा निर्माण होत आंतरिक आत्मा जागृत होऊन मन सुदृढ होते, उरलेल्या वेळात योगासन करावे. त्यात सर्वात महत्त्वाचे आसन ‘सूर्य नमस्कार’ होय. आयुष मंत्रालयाच्या योगतज्ज्ञानुसार सूर्य नमस्काराचे बारा प्रकार सांगितले गेले आहेत…
1. नमस्कारासन
2. हस्तोत्तानासन
3. पादहस्तासन
4. अश्वसंचलनासन
5. संतुलनासन
6. साष्टांग नमस्कारासन
7. भुजंगासन
8. पर्वतासन
9. अश्वसंचलनासन
10. पादहस्तासन
11. हस्तोतानासन
12. नमस्कारासन
पुन्हा वापस त्याच स्थितीत येणे म्हणजे नमस्कारासन होय. सूर्य नमस्कार केल्याने आपले बाह्य शरीर मजबूत होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते. पोटाची चरबी कमी होते, शरीर, मन निरोगी व दीर्घायुषी होते.
येत्या 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय दिनासाठी आयुष मंत्रालय द्वारा “वसुधैव कुटुंबकम’ या सिद्धांतावर “वन वर्ल्ड! वन हेल्थ!’ ही थीम ठरविण्यात आली आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह सर्वत्र जगभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. एक भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला योग जगभर आचरणात आणला जातो आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. येत्या 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सर्वांनी योगाभ्याससाठी संकल्प करावा, पण योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी योग तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या. फिट राहा! मस्त राहा! स्वतःला वेळ द्या! आनंदाने निरोगी जीवन जगा!
=======================