मुंबई – महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये मुंबईत रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. त्यात मुंबईतील धारावीमधील परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (दि. २२) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आयएमसीटीच्या समितीने धारावीच्या ट्रान्सिट कॅम्प, साई हॉस्पिटल आणि धारावी स्पोर्ट्स क्लबमधील क्वारंटाइन सुविधांची पाहणी केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील होता.
कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समिती (Inter Ministerial Central Committe) समवेत आज मुंबईतील धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, धारावी स्पोर्ट्स क्लब , साई हॉस्पिटल धारावी येथील क्वारंटाईन सुविधेची पाहणी केली. pic.twitter.com/R9H1lkbd6H
—
(@rajeshtope11) April 22, 2020