अकलूज – येथील महषीॅ कॉलनी त अकलूज शहर व तालुका युवासेनेच्या वतीने मोफत रोग निदान व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 275 रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधे वाटप करण्यात आली. यावेळी डॉ. एम. के. इनामदार, डॉ. तानाजीराव कदम, डॉ. सुनील राऊत, डॉ. अनिल बळते, डॉ. काळे, डॉ. पाटील, डॉ. पिसाळ, डॉ. कारंजे या तज्ज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्य लाभले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेचे पुजन अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, संग्रामनगरच्या सरपंच राजवर्धीनी माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे, सुजय माने पाटील, ऍड. विरेंद्र वाघमारे, सोनू पराडे पाटील, राजाभाऊ खिलारे, भूषण पराडे, संदीप गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता साळुंखे, संदीप इंगवले, बिपिन बोरावके, चेतन खिलारे, गणेश भिताडे, सचिन भोसले, सागर साळुंखे, रामेश्वर खिलारे, बचन साठे, अजिंक्य पासगे, बच्चन साठे यांनी परिश्रम घेतले. युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांनी आभार मानले.