‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदासाठी ‘यांची’ जोरदार चर्चा

नवी दिल्ली –  स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्यांना हात घातला. त्यात जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द ते दहशतवाद अशा गंभीर मुद्यांवर ते बोलते झाले. यावेळी, मोदींनी मोठी घोषणा करत संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे म्हटले.

संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. त्यांच्या या घोषणेनंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदासाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांचं नाव यादीत सर्वात पुढे असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यातच वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ मध्ये सीडीएसच्या कार्यपद्धती आणि भूमिकांवर कार्य करेल.

दरम्यान, वायुदलाचे एअर चीफ मार्शल बीएस धनोआ 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तर भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.