कोण आहे नुसरत भरुचाची ड्रीम गर्ल?

आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’ची घोषणा झाल्यापासून अभिनेता आयुष्मान खुराना प्रसिद्धीच्या झोतात आहे. नुकताच ड्रीम गर्लचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. यामध्ये आयुष्मान खुराना राधा, सीता, द्रौपदी आणि पूजाच्या भूमिकेत दिसून येत आहे. दरम्यान, आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील आयुष्मान खुरानाचा अंदाज फारच वेगळा असून अनेक जण त्याच्यावर फिदा झाले आहेत.

ड्रीम गर्ल चित्रपटाची अभिनेत्री नुसरत भरूचाने आयुष्मान खुरानाचा हा व्हिडीओ आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत राधाच्या भूमिकेसाठी आयुष्मान खुरानाने घागरा घातला असून सोळा शृंगार केला आहे. या व्हिडिओला नुसरत भरूचाने माझ्या ड्रीम गर्लला भेट. आयुष्यमान खुराना उर्फ आयुषी, अशी कॅप्शन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Meet my #DreamGirl co-actor @ayushmannk… oops co-actress Aayushi ? #BTS #13KoMainTeri

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

दरम्यान, “अंधाधुन’ आणि “बधाई हो’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर आयुष्मान खुराना आता “ड्रीम गर्ल’सोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. यात त्याच्यासोबत नुशरत भरूचा ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. एकता कपूरद्वारा निर्मित “ड्रीम गर्ल’चे दिग्दर्शन राज शांडिलिया करत आहे. १३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×