Coronavirus In India : देशात दोन वर्षांपूर्वी गेलेला कोरोना हा पुन्हा एकदा आपले हातपाय पसरताना दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काल दिवसभरात 292 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
As per the Ministry of Health and Family Welfare, Kerala reported 292 new active cases of COVID-19 and 3 deaths yesterday. The total number of active cases in the state is 2041. pic.twitter.com/uwoG6Fx0Fj
— ANI (@ANI) December 20, 2023
कोरोना व्हायरस आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले आहे. JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे 27 रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.