मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन संघाचे संस्थापक हेडगेवार यांना अभिवादन केलं. तर यावेळी अजित पवार गटाचे एकही आमदार संघ कार्यालयाकडे फिरकले नाही. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे. दरेकर यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ कार्यालयात आले, पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे संघाच्या कार्यालयात आले नाही. त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आलं. यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर पत्रकरांशी बोलतांना म्हणले,’मुख्यमंत्री त्याच विचारधारेतून आले आहेत, त्यामुळे ते संघाच्या कार्यालयात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या विचारधारेतून आले आहेत. हिंदुत्ववादी विचारधारेच्या अशा अनेक संस्थांच्या ठिकाणी मुख्यमंत्री अनेकदा जाऊन नतमस्तक झाले आहेत. या विचारधारेशी समरस झाले आहेत. त्यांच्या रक्तातच संघाची विचारधारा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.