लतादीदींना वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा!

मुंबई – अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या ‘लता मंगेशकर’ आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. भारताची गानसम्राज्ञी आज ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जगभरातील चाहत्यांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदौर येथे झाला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या आहे. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला.

लता मंगेशकर यांचे मूळ नाव ‘हेमा’ असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी ‘लता’ असे नाव ठेवले. उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून दीदींनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती अशा अनेक भारतीय प्रादेशिक तसेच विदेशी भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.

2001 मध्ये लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही दीदींना गौरविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.