वाघोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पेरणे -वाडेबोल्हाई जिल्हापरिषद गटांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निवेदन शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक (बापू )पवार यांना देण्यात आले.
यावेळी प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा पुणे जिल्हा विद्युत वितरण समितीचे सदस्य युवा नेते प्रदीप भाऊ कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश भाऊ वारघडे, पेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश ठोंबरे ,माजी सरपंच निलेश वाळके, माजी सरपंच बाबू शेठ लोंढे, वडू गावचे माजी सरपंच सतीष थिटे , माजी उपसरपंच बाप्पु कदम, हवेली राष्ट्रवादी युवक सरचिटणीस मानसिंग गावड़े,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्ष सागर तळेकर ,हवेली तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस विजय वाळुंज ,पुणे ज़िल्हा युवक सरचिटणीस श्याम खलसे , हवेली तालुक़ा राष्ट्रवादी उपाध्यक्ष नवनाथ वागस्कर ,युवा नेते विशाल वाळके , ग्रामपंचायत सदस्य निलेश वामने , पुणे ओबीसी सरचिटणीस दत्ताआबा गायकवाड़,युवा नेते दीपक वाघमारे , माजी उपसरपंच संतोष शिवले, माजी चेअरमन शांताराम शिवले व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला होता. पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी दिलेल्या समस्यांचे निवेदन आमदार अशोक पवार यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्यांच्यामार्फत सर्व समस्या सोडविण्यात येणार आहे.
प्रदीप वसंतराव कंद, राष्ट्रवादी युवा नेते