मुंबई : “करोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाययोजना आखले जात आहेत. राज्यभरातील थिएटर आणि नाट्यगृह मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता टीव्ही मालिका-चित्रपटांचे शूटिंगही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार या नव्या माध्यमाकडे वळले आहेत. काही कलाकारांनी या संकटातही संधी शोधली आहे.
अशातच अभिनेता अमेय वाघ युट्यूब या माध्यमातून आपली कला लोकांसमोर आणली आहे. Actor Amey Wagh, YouTube Channel अमेय वाघनं ‘वाघाचा स्वॅग’ या नावानं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसातच त्याच्या युटयूब चॅनेलला 12 हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळाले आहेत. तर व्हिडीओला 50 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळत आहेत.