भाजपाच्या माजी आमदाराचा भर सभेत आक्रोश

चंदिगड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मानापमान नाट्य सुरू आहे. नुकत्याच एका सभेत मंचावर बोलून दिल्याने भाजपाचा माजी आमदार रडू लागला. हरियाणामधील औरंगाबाद गावात भाजपाकडून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. यादरम्यान मंचावर बोलण्याची संधी न मिळाल्याने होडल मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार राहिलेले रामरतन रडू लागले.

दुसरीकडे मंचावरून इतर नेते लोकांना संबोधित करत होते. राम रतन यांना रडताना पाहून इतर भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि शांत केले. राम रतन यांच्याकडून त्यांच्या नाराजीचं कारण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पक्षाविरोधात आपली कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी म्हटले.

फरीदाबादमधील भाजपा खासदार कृष्णपाल गुर्जर यांनी सुरुवातीला हा व्हिडीओ जुना असावा असं सांगत उत्तर देण्याचं टाळले. पण नंतर त्यांनी सांगितलं की, कदाचित ते भावनिक झाले असावेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.