रेडा – मुंबई येथे भजपच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी अभ्यासपूर्ण आपली मते व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, गिरीश महाजन, श्रीकांत भारतीय, राणा जगजीतसिंह पाटील, प्रसाद लाड उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातील युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.