नवी दिल्ली :- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा टाईम्स लिस्ट ऑफ 100 लीडर या प्रसिद्ध यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत हरमनप्रीत कौर ही एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत तिने हा मान मिळवला. टाईम्सच्या 100 प्रेरणादायी लीडरमध्ये हरमनचा समावेश हा इनोव्हेटर्स या श्रेणीत करण्यात आला आहे. जेव्हापासून हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले तेव्हापासून संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
बांगलादेशात झालेल्या मालिकेत गैरवर्तन केल्यामुळे तिच्यावर दोन सामन्यांची बंदी लावली गेली असली तरीही या यादीत तिची निवड करताना या गोष्टींचा विचारही केला गेला नाही.