चेन्नई – भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णा याने 53 व्या बेएल बुद्धिबळ महोत्सवातील चेस-960 ही मानाची स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या सातही फेऱ्यांमध्ये तो अजिंक्य राहिला. त्याने सातव्या फेरीअखेर 5.5 गुणांची नोंद करत विजेतेपद मिळवले. त्याने यंदाच्या मोसमात मार्चपूर्वी झालेल्या स्पर्धांमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
त्यानंतर करोनाचा धोका वाढल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले. तसेच हवाई प्रवासावरही निर्बंध लावण्यात आल्यामुळे परदेशातील त्यावेळी सुरू असलेल्या अनेक स्पर्धांमध्येही त्याला सहभागी होता आले नाही. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या ऑनलाइन स्पर्धांमध्ये त्याने गेल्या 4 महिन्यांत हे दुसरे विजेतेपद मिळवले आहे. जर्मनीच्या विन्सेंट केमरने 5 गुणांसह दुसरे स्थान मिळवले तर, पोलंडच्या रोडोस्लाव आस्ताजेकने तिसरे स्थान प्राप्त केले.