नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर आठवड्याभरात सुनावणी घेऊन प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागले आहेत. नार्वेकर गुरुवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले असून कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे नार्वेकर कुणाला भेटणार? दिल्लीत कोणती सल्लामसलत होणार? व पुढील आठवडा चांगलाच गाजणार असल्याची गरमागरम चर्चा रंगली आहे. ( Ramdas Kadam, , Supreme Court, Shiv Sena, Rahul Narvekar, Uddhav Thackeray, Aditya Thackeray )
अशातच या प्रकरणारावर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यावरून आता ठाकरे पिता-पुत्रावर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले ?
“मी उद्धव ठाकरेंवर बोलेन आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य नाहीच… कारण आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही, कि मी आता त्यांच्यावर बोलावे, आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय”, असं म्हणत कदम यांनी ठाकरेंवर जहरी टीका केली
रामदास कदम यांनी पुढे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले, लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईलच. कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल लवकरच समजेल. ते पुढे म्हणाले, शिंदे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून संजय राऊतांची पोपटपंची चालू आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवताय. यापेक्षा जास्त काय आहे तुमचं? तुम्ही फक्त देव पाण्यात ठेवून बसला आहा’ असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
( Ramdas Kadam, , Supreme Court, Shiv Sena, Rahul Narvekar, Uddhav Thackeray, Aditya Thackeray )