मुंबई – गुजरात टायटन्सचा कर्णधार व भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ब्रॅड हॉग याने केली आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा व भारतीच संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघालाही यंदाच्या स्पर्धेत सलग पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी चमकदार झालेली नाही.
त्याची मानसिकता व त्याची कामगिरी पाहता बीसीसीआय त्याला जास्त काळ कर्णधारपदी ठेवेल असे वाटत नाही, उलट पंड्याने गुजरातचे नेतृत्व करताना संघाला विजयाच्या मार्गावर यशस्वी केले तसेच वैयक्तिक कामगिरीही सरस व सातत्यपूर्ण राखली आहे, त्यामुळे बीसीसीआयला रोहितचा पर्याय मिळाला आहे, असेही हॉगने म्हटले आहे.