IPL 2024 , Hardik Pandya Record : आयपीएल 2024 चा 37 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरत हार्दिक पंड्याने अनोखे शतक पूर्ण केले आहे. तो आज राजस्थानविरूध्द जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याचा मुंबई इंडियन्सकडून खेळताना हा त्याचा 100 वा सामना ठरला. मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा तो 7वा खेळाडू ठरला आहे.
हार्दिक पांड्याने गाठला ‘हा’ खास टप्पा…
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने सोमवारी एक मोठा टप्पा गाठला आहे. मुंबईसाठी 100 सामने खेळणारा तो 7वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा हा मुंबईसाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. एमआयसाठी 100 सामने खेळलेल्या सर्व 7 खेळाडूंची नावे येथे तुम्ही पाहू शकता.
1) रोहित शर्मा- 205
2) किरोन पोलार्ड – 189
3) हरभजन सिंह- 136
4) जसप्रीत बुमराह – 127
5) लसिथ मलिंगा – 122
6) अंबाती रायडू- 114
7) हार्दिक पंड्या – 100*
💯 matches in IPL for Mumbai Indians 💙
A special evening for #MI Captain Hardik Pandya in Jaipur 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI | @hardikpandya7 | @mipaltan pic.twitter.com/2NhJFv0eNY
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
हार्दिक पांड्या 2015 पासून खेळत आहे मुंबईकडून….
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते, जेव्हा तो फक्त 22 वर्षांचा होता. पदार्पण करताच त्याने वर्चस्व गाजवले होते, मुंबई इंडियन्ससाठी बॅट आणि बॉल अशा दोन्ही विभागात त्याने मॅच-विनर्स भूमिका पार पाडली. आकडेवारीबद्दल बोलायचे तर हा अष्टपैलू हार्दिकने 130 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 145.92 च्या स्ट्राइक रेटने आणि 29.88 च्या सरासरीने 2,450 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत. या कालावधीत त्याने 33.82 च्या सरासरीने 57 विकेट्सही घेतल्या आहेत.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
हार्दिक मुंबई इंडियन्सचे करत आहे नेतृत्व…
IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिकला सोडले होते. त्यानंतर गुजरात टायटन्सने या खेळाडूला जोडून संघाची कमान सोपवली. हार्दिकने जीटीला चॅम्पियन बनवून आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर, आयपीएल 2023 च्या लिलावानंतर लगेचच मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या कॅम्पमध्ये परत बोलावले आणि फ्रँचायझीने रोहित शर्माकडून संघाचे कर्णधारपद हार्दिककडे सोपवले.