गरोदर महिलेचा छळ; मारहाण करून गर्भपात

पिंपरी  – गरोदर महिलेला सासरच्यांनी उपाशी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच, तिच्या पोटावर मारुन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. हा प्रकार 16 मे ते 27 मे 2019 या कालावधीत घडला. या प्रकरणी 22 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती पंकज नाकाडे, परशुराम नाकाडे, हौसाबाई नाकाडे, धनंजय नाकाडे, चंदा अशोक घुले, फुलाबाई नाकाडे (सर्व रा. भेंडा खुर्द ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार वेगवेगळ्या कारणांसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी आरोपी तगादा लावत होते. महिलेने अनेकदा पैसे देऊनही सासरकडच्या नातेवाईकांची मागणी कमी होत नव्हती. पीडित महिलेने आपल्या आई-वडिलांकडे आता पैसे नाहीत असे सांगितल्यामुळे सासरकडेच नातेवाईक चिडले आणि गरोदर महिलेचा छळ करुन तिला उपाशी ठेऊन आणि तिच्या पोटावर मारुन गर्भपात घडवून आणण्याचे कृत्य देखील आरोपींनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.