पुणे – दुचाकीवरुन जाणाऱ्या महिला वकिलाचा विनयभंग करण्यात आला. ही घटना वडगावशेरीतील प्रसादनगर येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका 36 वर्षीय महिला वकिलाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनूसार त्या दुचाकीवरुन पुणे स्टेशन येथून घरी निघाल्या होत्या. यावेळी आरोपीने ऍक्टीव्हा गाडीवरुन त्यांचा पाठलाग केला. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने त्याची दुचाकी फिर्यादीच्या पुढे दामटली.
यानंतर अचानक रस्त्यात थांबत फिर्यादीसमोर अश्लिल चाळे केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.