हडपसर (प्रतिनिधी) | हडपसर मतदारसंघ भाजपाच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित राहत शहराध्यक्ष, माजी आमदार व सर्व नेते मंडळी यांनी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच राजकारणापलिकडे असलेल्या आठवणी व किस्से एकमेकांना सांगत, हास्यविनोद करत भाजपचा हा दिवाळी फराळ पार पडला.
हडपसर भाजपच्या वतीने ससाणे लॅान्स येथे या दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर ,शहर सरचिटणीस गणेश घोष, संदिप लोणकर, शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, मतदारसंघ अध्यक्ष संदिप दळवी, नगरसेवक मारुती तुपे, संघटन सरचिटणीस गणेश घुले, दादा कोद्रे,सुनिल धुमाळ, विजया वाडकर,नगरसेविका रंजना नानी टिळेकर, मनिषा कदम,उज्ज्वला जंगले , वृषाली कामठे,सरपंच शिवराज घुले, युवा मोर्चा अध्यक्ष अमर गव्हाणे, महिला अध्यक्षा स्वाती कुरणे ,जीवन जाधव, संजय सातव,इम्तियाज मोमीन, अविनाश मगर,प्रमोद सातव, आकाश डांगमाळी, अमित घुले, आण्णा धारवाडकर ,विकास भुजबळ, शोभा लगड, हनुमंत घुले ,शैलेश बेल्हेकर, बाळासाहेब घुले, पोपटराव वाडकर तसेच सर्व आघाडी अध्यक्ष ‘बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान महिला आघाडी घोषित करून इतर पदाधिकारी नियुक्ति पत्र यावेळी देण्यात आले.अशी माहिती मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांनी दिली.
नेहमी संघटनात्मक कामांसाठी सर्वांची भेट होत असते पण आजची मैफल वेगळी होती. सर्वांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची व परिवाराच्या खुशालीची विचारपूस केली. अशी भावना यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली.