हडपसर – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर येथील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ “मीराकी” 2021- 22 व शिवजयंती उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने व टीव्ही अभिनेते माननीय अक्षय वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले , शहर सरचिटणीस विक्रम शेवाळे, संजीवनी जाधव, अविनाश काळे, प्राचार्य डॉ. अशोक भोसले , प्राचार्य सचिन कोतवाल , शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अक्षय शेवाळे , बाळासाहेब शेवाळे, प्रीतम शेवाळे, प्राचार्य पंडित शेळके, कुणाल देशमुख , आर एस डान्स अकॅडमी चे नृत्य दिग्दर्शक राहुल कसबे व सुप्रिया कसबे हे मान्यवर उपस्थित होते .
प्राचार्य अश्विनी शेवाळे यांनी महाविद्यालयात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा यांचा आढावा सांगितला तसेच यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे च्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले .दरम्यान प्राचार्य अश्विनी शेवाळे यांनी लिहिलेल्या ब्रिलियंट पब्लिकेशन च्या फार्मासुटिकल केमिस्ट्री या पुस्तकाचे तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मॅन्युअल चे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. योगिता शिंदे व प्रा। देवयानी किरवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा कटके यांनी केले.