Gurpatwant Singh Pannu Threating। झारखंडची राजधानी रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र सामन्यापूर्वी इंग्लडच्या संघावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने इंग्लंड संघाला सामना रद्द करून परतण्याची धमकी दिली आहे. यासाठी झारखंडच्या नक्षलवाद्यांना भडकावले आहे. याप्रकरणी मंगळवारी रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
नक्षलवाद्यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पन्नूने रांचीचे जेएससीए स्टेडियम आदिवासींच्या जमिनीवर बांधल्याचे म्हटलंय. हा सामना आदिवासींच्या जमिनीवर होऊ नये. पन्नूने हा व्हिडिओ यूट्यूबवर जारी केला आहे. त्यांनी माओवाद्यांना झारखंड आणि पंजाबमध्ये रांचीत होणारा कसोटी सामना रद्द करण्यासाठी गोंधळ घालण्यास उचकवले आहे.
भारत आणि इंग्लंडच्या कर्णधारांना धमकी दिली Gurpatwant Singh Pannu Threating।
पन्नूने यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यांनाही धमकी दिलीय. त्याने इंग्लंडच्या कर्णधाराला भारत दौरा रद्द करून संघासह परतण्यास सांगितले. पन्नूकडून धमकी मिळाल्यानंतर झारखंड पोलीस विभागात खळबळ उडालीय. स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंत प्रत्येक कोपऱ्यात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. विमानतळालाही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.
पन्नू कोण आहे? Gurpatwant Singh Pannu Threating।
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूचा जन्म १४ फेब्रुवारी १९६७ रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्याचे आई-वडील मरण पावले आहेत. तर एक भाऊ परदेशात राहतो. कधी कॅनडात तर कधी अमेरिकेत राहून तो तिथे राहणाऱ्या हिंदूंना उघडपणे धमक्या देतो.
पन्नू यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून कायद्याचे शिक्षण घेतलंय. तो सध्या अमेरिकेत कायद्याची प्रॅक्टिस करतोय.
पन्नू यांनी 2007 मध्ये ‘सिख फॉर जस्टिस’ ही संघटना स्थापन केली होती. जुलै 2020 मध्ये भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी आणि हिंसक कारवाया करत असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थेचा दावा आहे.