नवी दिल्ली – बलात्कार आणि माजी डेरा (Dera) व्यवस्थापक हत्येप्रकरणी सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गुरमीत सिंग (Ram Rahim News) मंगळवारी आठव्यांदा तुरुंगातून बाहेर आला. 21 दिवसांची पेरोल रजा मिळाल्यानंतर, तो सुनारिया तुरुंगातून उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरनवाला आश्रमासाठी रवाना झाला. (Gurmeet Ram Rahim getting parol )
राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इसान (hanpreet) आणि तिचे वकील दोन वाहनांतून जिल्हा कारागृहाबाहेर पोहोचले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात गुरमीत सिंग यांच्या तीन वाहनांच्या ताफ्याने भरधाव वेगाने परिसर सोडला. कोणतीही घटना घडू नये यासाठी कारागृह परिसरापासून महामार्गापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लैंगिक छळ प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा (Dera sachha sauda) प्रमुख गुरमीत सिंग ऑगस्ट 2017 पासून सुनारिया तुरुंगात बंद आहे. यानंतर गुरमीत सिंगला दोन वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 25 ऑगस्ट 2017 रोजी त्याला दोषी घोषित केले होते. त्याच दिवशी त्यांना हेलिकॉप्टरने रोहतक येथील सुनारिया तुरुंगात पाठवण्यात आले.24 ऑक्टोबर रोजी गुरमीत सिंगला पहिल्यांदा 24 तासांच्या गुप्त पॅरोलवर बाहेर काढण्यात आले. (Ram rahim story)
गुरमीत सिंग नवव्यांदा तुरुंगातून बाहेर आला
यानंतर 21 जून रोजी त्याला आईला भेटण्यासाठी 48 तासांची कोठडी देण्यात आली. 7 फेब्रुवारी 2021 रोजी 21 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. गुरमीत सिंगला मंगळवारी नवव्यांदा तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. (Gurmeet story)
तुरुंगातून कधी बाहेर आला?
24 ऑक्टोबर 2020 – 24 तासांचा गुप्त पॅरोल
21 जून 2021 – 48 तासांची कोठडी
07 फेब्रुवारी 22 – 21 दिवसांचा पॅरोल
जून 2022 – 30 दिवसांचा पॅरोल
ऑक्टोबर 2022 – 40दिवसांचा पॅरोल
जानेवारी 2023 – 40 दिवसांचा पॅरोल
जुलै 2023 – 30 दिवसांचा पॅरोल