नवी दिल्ली – बाबा राम रहीम हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सध्या राम रहीम हे जेलमध्ये आहेत. परंतु ते आता जेलबाहेर येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. दोन दिवसांपूर्वी राम रहीमने जेल प्रशासनाकडे पॅरोलच अर्ज करून सत्संगासाठी जाण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान, आता त्याचा पॅरोल मंजूर झाला असून, राम रहीम तब्बल 40 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असलेले राम रहीम यांच्यावर हत्या आणि बलात्काराचे आरोप होते यामुळेच सध्या त्यांची जेलवारी सुरु आहे. अशात त्यांनी जेल प्रशासनाकडे सत्संगासाठी पॅरोल अर्ज केला असून, आता तब्बल 40 दिवसांसाठी बाहेर येणार आहेत. सच्चा सौदाचे दुसरे संत शाह सतनाम महाराज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 25 जानेवारी रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठीच राम रहीम बाहेर येणार आहेत.
दरम्यान, राम रहीम गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर दरम्यान तब्बल चाळीस दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता. त्यावेळी तो त्याच्या कुटुंबियांसोबत डेरामधेच राहिला होता. यावेळी त्याने दिवाळी आणि इतर सत्संग देखील पार पाडले होत. राम रहिम हे जेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या भक्तांची मोठी संख्या होती. मात्र त्याच्यावर बलात्कार आणि खुनाचे आरोप झाल्यानंतर सर्व चित्र बदलेलं आहे.