नवी दिल्ली – बाबा राम रहीम हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सध्या राम रहीम हे जेलमध्ये आहेत. परंतु ते आता जेलबाहेर आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी राम रहीमने जेल प्रशासनाकडे पॅरोलच अर्ज करून सत्संगासाठी जाण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, आता त्याचा पॅरोल मंजूर झाला असून, राम रहीम तब्बल 40 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर आले आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असलेले राम रहीम यांच्यावर हत्या आणि बलात्काराचे आरोप होते यामुळेच सध्या त्यांची जेलवारी सुरु आहे. अशात त्यांनी जेल प्रशासनाकडे सत्संगासाठी पॅरोल अर्ज केला असून, आता तब्बल 40 दिवसांसाठी बाहेर आले आहेत. सच्चा सौदाचे दुसरे संत शाह सतनाम महाराज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 25 जानेवारी रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठीच राम रहीम बाहेर आले आहेत.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राम रहीम शनिवारी बागपतमधील त्याच्या बर्नवा आश्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्याचा आनंद साजरा केला. यावेळी राम रहीम यांनी चक्क तलवारीने केक कापला. राम रहीम बलात्कार आणि हत्येप्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आणि अश्यातच तलवारीने केक कापल्यामुळे राम रहीम पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
राम रहीम यांच्या तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पॅरोलवर आल्यानंतर कोणत्याही शिक्षा झालेल्या कैद्याने शस्त्रास्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यास शस्त्र कायद्यानुसार बंदी आहे. असे असतानाही राम रहीमने तलवारीने केक कापला असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.