Gulzar- जगप्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा 2023 च्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी दोघांच्या नावाची घोषणा केली. । Gulzar
ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरु रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्यासोबतच गुलजार यांनी गझल आणि कविता क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. त्याचवेळी जन्मापासून दृष्टीहीन असतानाही जगद्गुरु रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा आणि वेद आणि पुराणांचे गाढे अभ्यासक आहेत.
गुलजार हे चित्रपटसृष्टीतील कामांसाठी ओळखले जातात. तसेच उत्कृष्ट उर्दू कवी देखील आहेत. यापूर्वी त्यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
गुलजार यांचे खरे नाव संपूर्ण ‘सिंग कालरा’ आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी अविभक्त भारतातील झेलम जिल्ह्यातील देना गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माखन सिंग होते. गुलजार यांना अभ्यासात फारसा रस नव्हता.
विशेष म्हणजे, ते बारावीच्या परीक्षेतही नापास झाले होते. पण त्यांची साहित्याची आवड कायम होती. रवींद्रनाथ टागोर आणि शरतचंद हे त्यांचे आवडते साहित्यिक होते.
दुसरीकडे, चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरु आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य ज्यांनी जन्मानंतर केवळ 2 महिन्यांनी आपली दृष्टी गमावली.
ते एक उत्कृष्ट शिक्षक तसेच संस्कृत भाषेचे अभ्यासक आहेत. त्यांना 22 भाषांचे ज्ञान आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना भारत सरकारने 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते.