पुणे – चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज गुजरात टायटन्सशी होत आहे. गुजरातचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चेन्नईच्या संघाने पाचपैकी चार सामने गमावले आहेत. चेन्नईच्या संघाने शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जिंकला आहे.
गुजरातचा कर्णधार राशिद खानने टाॅस जिंकला असून त्याने चेन्नईविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स संघाला सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी राशिद खान संघाचे नेतृत्व करत आहे.
Match 29 Toss Update@gujarat_titans have won the toss and elect to bowl first against #CSK.
Rashid Khan to the lead the side in the absence of Hardik Pandya.#TATAIPL pic.twitter.com/MXo3PQBGJ1
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
टाॅस दरम्यान रशीदने सांगितले की, हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढच्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी आम्हाला आशा आहे. मॅथ्यू वेडलाही संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्दिकच्या जागी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
चेन्नई सुपर किंग्ज : रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश टेकशाना, मुकेश चौधरी.
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान (कर्णधार), अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.