मुंबई – आयपीएल स्पर्धेवर करोनाच्या धोक्यामुळे सलग दोन वर्षे सावट होते. आता ते दूर झाल्यामुळे यंदाच्या स्पर्धेचा समारोप दणक्यात साजरा करण्याचे बीसीसीआयने निश्चित केले आहे. त्यासाठी हा समारोप प्रसंग जगभरात नावाजला जावा यासाठी चक्क निविदा मागवण्यात आल्या आहेत.
या निविदा प्रक्रियेचे नियम आणि अटी, पात्रता निकष, निविदा जमा करण्याची प्रक्रिया अधिकार आणि उत्तरदायीत्व हे सर्व आरएफपी मध्ये नमुद केले आहे. ही निविदा भरण्यासाठी 1 लाख रुपये विना परतावा तत्वावर जमा करावे लागणार आहेत. त्यावर जीएसटीचा कर वेगळा असेल व हे आरएफपी विकत घेण्याची अंतिम मदत 25 एप्रिल आहे. या स्पर्धेच्या मोसमातील अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.