अहमदाबाद – गुजरातमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट आहे. मूक क्रांती घडत आहे. गुजरातमधील यावेळची निवडणूक देशाला नवी दिशा देईल, असे भाकीत कॉंग्रेस आमदार आणि प्रभावी दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस स्पष्ट बहुमत मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#GujaratElection । गुजरातेत भाजपला धक्का! माजी मंत्र्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
गुजरातमध्ये परिवर्तन अटळ आहे. हिंदुत्वासारखे भावनिक मुद्दे सत्तारूढ भाजपकडून उपस्थित केले जात आहेत. पण, यावेळी त्या मुद्द्यांचा उपयोग होणार नाही. यावेळची निवडणूक अनियंत्रित कारभार, बेरोजगारी आणि महागाई विरोधातील आहे. जनतेने मोठ्या प्रेमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती दोनवेळा देशाची सत्ता सोपवली. पण, बेरोजगारी कमी झाली नाही. महागाई थांबली नाही.
#GujaratElection । गुजरातेत भाजपला धक्का! माजी मंत्र्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
मोदींकडे आता सांगण्यासारखे, देण्यासारखे नवे काहीच नाही. जनताही त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेऊन नाही. मोदींनी घोषणा केलेल्या स्मार्ट सिटी कुठे आहेत? दरवर्षी 2 कोटी रोजगार पुरवण्याच्या आश्वासनाचे काय झाले? मोदींच्या विकासाच्या मॉडेलने जनतेला काय मिळाले? अच्छे दिनांचे काय, असे सवाल मेवानी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केले. मोदींनी आता रिटायर व्हावे, असे उपरोधिक आवाहनही त्यांनी केले.
आपला एकही जागा मिळणार नाही
भाजप आणि कॉंग्रेसनंतर गुजरातमध्ये आप तिसरी राजकीय शक्ती म्हणून पुढे आल्याचे विश्लेषण मेवानी यांनी फेटाळून लावले. दोन-चार महिने सोशल मीडियावरून प्रचार करून, काही बैठका घेऊन कुठला पक्ष निवडणूक जिंकू शकत नाही. आपकडे कार्यकर्ते कुठे आहेत? तो पक्ष गुजरातमध्ये एकही जागा जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.