पेठ- कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी महिलांना कृषीविषयक व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आल्याचे कृषी मंडल अधिकारी प्रमिला मडके यांनी सांगितले. कुरवंडी येथे झालेल्या कार्यक्रमात महालक्ष्मी सद्गुरू कृपा व चौभाबाई देवी महिला बचत गटाच्या महिलांना नेडेफ शेड आणि इतर माहिती दिली.
याप्रसंगी सारिका वाघमारे, वंदना जाधव, प्रतीक्षा तोत्रे, नाजुका मते, संगीता जाधव, वत्सला तोत्रे, इंदूबाई धोत्रे आदी महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी कृषी मंडल अधिकारी प्रमिला मडके यांनी महिला शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून मिळणाऱ्या विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्र, त्यातून मिळणारे फायदे यांविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सारिका वाघमारे यांनी केले, तर वंदना जाधव यांनी आभार मानले.